🔸विवीध विषयांवर कऱण्यात आली चर्चा
✒️सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा (दि .19 जुलै) :-
चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने सन २०२५-२६ या सत्राकरिता राज्य पुरस्कार सुधारित प्रवेश अर्ज भरण्याबाबत व अभ्यासक्रमातील बदल , संभावित जिल्हा मेळावा आयोजन, स्काऊट गाईडच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांना विषयाची उजळणी होणे आवश्यक आहे .
करिता तालुका निहाय स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन यांचे उजळणी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्याबाबत आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड जिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे आयोजीत सभेला लक्ष्मणराव धोबे , चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक स्काउट्स, दिपा मडावी, जिल्हा संघटीका, गाईड्स, यशवंत हजारे , सेवानिवृत्त माजी जिल्हा संघटक, स्काउट्स, किशोर ऊईके, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, बादल बेले , प्रशांत खुसपुरे , नागेश सुखदेवे , किशोर कानकाटे , प्रमोद बाबळीकर , अविनाश जुमडे , शुद्धोधन मेश्राम , सीमा वादिले , विजयालक्ष्मी कुंडले , सीमा भसारकर , पुरुषोत्तम गायकवाड , रंजना किनाके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला स्काउट्स गाईड्स सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
सभेत अनेक विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. राजेश पाताळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर , अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर तथा जिल्हा आयुक्त चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.







