मुलानेच केली जन्मदात्या पित्याची हत्या 

🔸कुऱ्हाडीचे घाव घालून पित्यालाच पाठवले यमसदणी 

✒️ शेगाव बू (Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

शेगाव बू(दि.19 जुलै) :- वरोरा तालुक्यातील शेगाव बु मधील विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे आज सकाळी मुलानेच आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने सपा सप वार करत जागीच ठार केले. ही घटना ११ वाजता घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाब पत्रुजी दातारकर (वय५८)असे मृत वडिलांचे नाव आहे. मुलगा अभय गुलाब दातारकर(वय३४)वर्ष असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

प्राप्त माहितीनुसार वडील घरी बसून असताना आरोपी मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने एकावर एक वार करून जागीच ठार केले. या बाबतची माहिती स्थानिकांना मिळताच घटनेची माहिती शेगाव बु पोलिसांना देण्यात आली.

घटनास्‍थळी पोलीस तात्‍काळ दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून खुणाचे नेमके कारण अद्याप कडू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिह यादव यांचे मार्गदर्शन मध्ये PSI सुमित कांबळे, ASI दिनकर घोटेकर मदन येरणे,निखिल कौरासे, छगन जांभुळे,दिनेश ताटेवार, पोलिस शिपाई संतोष निषाद, प्रशांत गिरडकर,प्रगती भगत हे करीत आहेत.