नाबार्ड द्वारा खेमजई येथे वृक्षारोपण व जागतिक सहकार वर्ष साजरे

✒️ शेगाव बू (Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.7 जुलै) :- दिनांक 4 जुलै 2025 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा खेमजई येथे नाबार्ड व वाडी आदिवासी विकास समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला माननीय तृणाल फुलझेले साहेब जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड यांनी सहकार तत्व व त्याची गरज काय आहे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीषा चौधरी सरपंच खेमजई तर प्रमुख अतिथी डॉ. सतीश अघडते, पशुधन विकास अधिकारी, संजू जांभुळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खेमजई, वाडी समिती सदस्य सुरेश कुत्तरमारे इत्यादी इत्यादिने मार्गदर्शन केले.

शाळेच्या परिसरात व राजू गायकवाड यांच्या शेतात झाडे लावण्यात आली.या कार्यक्रमात आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा (रावे )चे विध्यार्थी सहभागी झाले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक भूमेश तांडेकर, व्यवस्थापन वाडी प्रकल्प यांनी केले तर संचालन रमेश चौधरी तर आभार भाविका घरत यांनी केले.