🔹पत्रपरिषदेत पास्टर्स असो. चे सचिव गुनगंटीवार यांची माहिती
✒️ संजय तिवारी चंद्रपूर(Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.3 जुलै) :- ख्रिश्चन समुदायाच्या धर्मगुरू बद्दल आमदार गोपीचंद पडवळकर यांनी केलेल्या विधानाविरुद्ध गुरुवार 3 जुलै रोजी शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशनचे सचिव राजू गुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार गोपीचंद पडवळकर यांनी 17 जून रोजी ख्रिश्चन समुदायाच्या धर्मगुरू बद्दल आक्षेपार्ह आणि समाजाबद्दल तेढ निर्माण करणारे विधान केले होते. त्यामुळे समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यांच्या विधानाविरुद्ध गुरुवार 3 जुलै रोजी चंद्रपूर शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन चे सचिव राजू गुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे ख्रिश्चन समुदायाला जयंत टॉकीज जवळील सेंट आंद्रिया चर्च पासुन आयोजित निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.







