मेहनत हीच खरी यशाची पहिली पायरी… ॲड अनंता रामटेके

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि.29 जानेवारी) :- तालुक्यातील भिवाजी वरभे महाविद्यालय उद्या कनिष्ठ कल महाविद्यालय बोथली येथे नुकताच प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी एडवोकेट अनंत रामटेके यांची मुख्य उपस्थिती होती.

महाविद्यालयामध्ये झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी मोमेंटो आणि मेडल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एडवोकेट अनंत रामटेके यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार महाविद्यालयांना मार्फत करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेत ची तयारी कशी करावी, वेळेचे व अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ” ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेमध्ये कुठेही कमी नाही”, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी उंच भारी घेऊ शकतात असे प्रतिपादन एडवोकेट अनंत रामटेके यांनी आपल्या भाषणात केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य कुमारी बालपांडे मॅडम उपस्थित होत्या.संचालन शिक्षक संजय वरभे यांनी केले प्राध्यापक नरेंद्र विकार, प्राध्यापक पिसे, शिक्षक लिपटे सर यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.