✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.6 डिसेंबर) :- चारगाव बु. चे आराध्य दैवत श्री संत सद्गुरु नानाजी महाराज तथा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी महोत्सव दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाला आयोजित असलेले सर्व संत स्मृती मानवता दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो.
यावर्षी देखील या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणून श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ चारगाव बूज चे गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान 6 डिसेंबर भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्याने व पुण्यतिथी महोत्सव निमित्याने आयोजित भजन सांध्यात विविध धार्मिक गीते सादर करण्यात आली या भजन सांध्याने चारगाव वासियांचे मने जिंकून सर्वांना मंत्रमुग्ध केले .
यावेळी तबला वादक कु. वैभव मस्की , तर हार्मोनियम व कॅसियो वादक राकेश कुरेकर , गायक अनिल भलमे, दिपक चवले, शंकर गौरकार सौ . मीना नाकाडे, टाळ सातसांगत गोविंदा मांदाळे व इतर गुरुदेव सेवा भजन मंडळ चे कार्यकर्ते उपस्थित होते गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने भजन संध्या या लाभ घेतला.






