शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विद्युत पुरवठा 24 तास द्या…अतेहश्याम अली यांची मागणी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव चारगाव परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फक्त बारा तास विद्युत पुरवठा सुरू असतो परंतु येत्या हंगामात हरभरा पिकाकरिता रात्रंदिवस पाणी करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा याकरिता चारगाव बुद्रुक येथील महावितरण कार्यालय येथील अभियंता श्री रामटेके यांना निवेदनातून कळविण्यात आले आहे.

सदर हे निवेदन माननीय श्री अतेहशाम अली यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी निवेदन दिले सविस्तर असे की आत्ताच नुकते सोयाबीन कटाईचा हंगाम संपला असून दुसरे पीक म्हणजे हरभरा या पिकाकरिता पाण्याचा सर्वाधिक वापर असल्याने या पिकाकरिता रात्रंदिवस पाणी करावे लागत असते . परंतु लाईटच्या अभावी तसेच महावितरण कार्यालयाच्या लोड शेडींगच्या वेळापत्रकानुसार पाणी करावे लागते कधी दिवसा तर तर कधी रात्री असा यांचा वेळापत्रक असल्याने रात्रौ बे रात्री शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी करणे म्हणजे जीवाला उद्धार होऊन पाणी करावे लागते त्यात शेत शिवारात असलेले साप, विंचू , रानटी डुक्कर, तसेच अन्य रानटी जनावरांचा सामना करावा लागतो यात अनेकांना अनेक संकटाचा सामना करून आपला जीव गमवावा लागतो करिता शेतकऱ्यांच्या सोयी करता विद्युत पुरवठा 24 तास सुरळीत ठेवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.. 

       यावेळी श्री संदीप विधाते , सुनील गेडाम , विलास कष्टी , गुणवंत देहरकर , दत्तू पाटील कुंभारे , गणेश मोडक , दशरथ देहारकर , अरुण नैताम , भानुदास झाडे , इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.