माजरी येथे चष्मे वाटप संपन्न

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.26 सप्टेंबर) :- चला बदल घड़वुया या मोहिमे अंतर्गत वरोड़ा भद्रावती मतदरसंघात डोळे तपासणी, आरोग्य तपासनी शिबिरे , मॅरेथाॅन स्पर्धा , व्यवसाय मार्गदर्शन , प्रेरणेतुन प्रगति , असे विविध सकारात्मक व समाज उपयोगी उपक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत .

या मोहिमे अंतर्गत डॉ चेतन खुटेमाटे यांच्या गुरुदृष्टि नेत्रालय तर्फ़े १८ आॅगस्ट रोज़ी माजरी येथे भव्य नेत्र तपासनी शिबीरा द्वारे ग्रामीण भागातील १८०० रुग्णांची नेत्र तपासनी करण्यात आली होती , दिनांक २६ सप्टेबंर रोज़ी , माजरी येथे चला बदल घड़वुया मोहिमेचाच एक भाग म्हनून ८०० गरजू रूग्णाना मोफ़त चष्मे वाटप करण्यात आले . सर्व उपस्थितानी या सेवाभावी व जनोपयोगी कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन डॉ चेतन खुटेमाटे,प्रमुख पाहुणे तालुक़ा महिला कांग्रेस अध्यक्ष संध्याताई पोड़े , पप्पुभाई शेख , राजा ख़ान , निशांत चव्हाण , रविभाऊ भोगे , रविभाऊ कुर्दुला , बंडूभाऊ वनकर , विजय यादव , अनूप खुटेमाटे ,आकाश राम , दिदार अली , सचिन खुटेमाटे ,फ़ुरख़ान शेख ,संजय उमरे ,संयोग कुकुडकर ,वेद ठावरी ,संजुभाऊ पोडे इत्यादि मान्यवर प्रामुख्याणे उपस्थित होते.