शेगावात मस्कऱ्या गणपतीचे थाटात आगमन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 सप्टेंबर) :- स्थानिक शेगाव येथे चंद्रपूर जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर मस्कऱ्या गणपती विसर्जन प्रख्यात असल्यानं गावातील तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त विसर्जनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने येत असतात .

आज संकष्ट चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर मस्कर्या गणपतीचे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली . विशेष म्हणजे ढोल ताशांच्या गजरात तसेच dj साऊंड च्या आवाजात शेगाव नगरीचे युवक मोठ्या उत्साहाने नाचत गाजत बाप्पाची गावात भव्य मिरवणूक काढून रात्री दहा वाजता मसकऱ्या गणपती चें विधीवथ पूजा अर्चना करून आरती करून प्रतिष्ठापना करण्यात आली .

यावेळी गावातील अनेक गणेश मंडळांनी सहभाग घेतला व गावात 15 ते 20 मस्काऱ्या सार्वजनिक गणेश मंडळात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.. शिवाय या भव्य मिरवणूक काही विपरीत परिणाम होनार नाही या करिता शेगाव चे ठाणेदार श्री योगेंदरर्सिंग यादव यांनी चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.