महाराष्ट्रातील फेमस गायक कुणाल पाटील यांचा विविध ठिकाणी सत्कार

✒️ सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.20 सप्टेंबर) :- अत्यंत गरीब परिस्थिती असल्यामुळे जॉब करून आपल्या गायनाची आवड पूर्ण करणारा कुणाला पाटील आज 2000 पेक्षा जास्त गाणी गात आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून ऑर्केस्ट्रा मध्ये गात असून कुठलेही गायनाचे शिक्षण नसताना आज महाराष्ट्राचा फेमस सिंगर आहे.

                मराठी गीत ,कोळी गीत, हिंदी भाषेतील गाणे, भोजपुरी या सर्व भाषेतील गाणे मदन पाटील स्टुडिओ अक्षय रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये त्याचे खूप गीत रेकॉर्ड केले आहे त्यापैकी संपूर्ण महाराष्ट्र फेमस झालेले कुणाल पाटील यांचे लोकगीत ऑंटी माझ्या झोपडीत ये ना गाण्याने लोकांना वेड लावल आहे बाळूभाई ग्रुप ,देवाग्रुप, टायगर ग्रुप आणि इतर ग्रुपचे गाणे गायले आहे. जालना किंग गजूभाऊ तौर यांचं गाणं गायले असून या गाण्याला महाराष्ट्रात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून कुणाल पाटील यांना प्रसिद्धी मिळाली आहे .

असा कोणता जिल्हा तालुका नाही जिथले गीत कुणालने गायले नसेल. आमदार खासदार मुख्यमंत्री इतर समाज सेवकांची सुद्धा तसेच वाढदिवसाचे गाणे गायले आहे. दिवसेंदिवस कुणाल पाटील यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे मुंबईतील प्रत्येक भागात सार्वजनिक गणेश मंडळातर्फे कुणाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे .पुढील वाटचालीस पत्रकार सारंग महाजन यांच्याकडून महाराष्ट्र फेमस कुणाल पाटील याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.