वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ अब्दुल शेख यांना निलंबित करा

🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अश्लील व अर्वांच्य भाषेत रुग्णांच्या नातेवाईकाला शिवीगाळ करणाऱ्या डॉ. शेख विरोधात मिर्ची लाव आंदोलन

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि. 12 सप्टेंबर) :-

वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात बिएचएमएस असलेले डॉ. अब्दुल शेख हे मागील अनेक वर्षांपासून इथे कार्यरत असून ते वरोरा नगरपरिषदच्या डॉ आहेत, पण ते उपजिल्हा रुग्णालयातचं ड्युटी करतात, दरम्यान रुग्णांसोबत त्यांची भाषा ही अश्लील, अर्वांच्य व अरेरावीची असून महिला रुग्णांदेखत अश्लील भाषा ते वापरत असल्यामुळे रुग्णांसोबतचं त्यांचे नातेवाईक यांच्यात प्रचंड चीड आणि आक्रोश आहे, दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील स्टॉफ सुद्धा या डॉक्टर मुळे त्रस्त असून दिनांक 9/9/2024 ला लहान मुलांची तपासणी त्यांच्याकडे असतांना त्यांनी एका रुग्णांच्या नातेवाईक यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती.

त्यावेळी महाराष्ट्र सैनिक बाळू गेडाम हे आपल्या लहान मुलाला घेऊन रुग्णालयात उपस्थित असतांना त्यांनी डॉ. अब्दुल शेख यांची खरडपट्टी काढून त्यांची मस्ती जिरवली, डॉ शेख हे रुग्णांच्या नातेवाईकांना शिवीगाळ देतानाचा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रचंड व्हायरलं होतं असून डॉ शेख या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्वरित निलंबानाची कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मिरची लाव आंदोलनाच्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिला आहे, यावेळी मनसेचे शहर सरचिटणीस प्रतीक मुडे, शहर उपाध्यक्ष संदीप धानोरकर, महाराष्ट्र सैनिक बाळू गेडाम, उत्तम चिंचोलकर, लोकेश मेश्राम, अखिल कांबळे, जुनेद सय्यद, तुषार कुरेकार उमेश तिवारी, सागर माथनकर, भूषण लोंढे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. अब्दुल शेख हे अनेक वर्षांपासून वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती नसताना व आता सुद्धा त्यांची बदली झाली असतांना इथेच ते ड्युटी करत आहे व त्यांच्याकडे पीएम करण्याचे काम नसताना सुद्धा स्वतःच्या मर्जीने ते पीएम करतात, आतापर्यंत त्यांनी 300 पेक्षा जास्त पीएम केले आहे, जेंव्हा की नियमानुसार बिएचएमएस डॉ पीएम करू शकत नाही, असे असतांना तो नियम इथे पाळला जात नाही, त्यामुळे अगोदरच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार होतं नसल्याने इथे येणाऱ्या रुग्णांमध्ये असंतोष आहे.

अशातच डॉ. अब्दुल शेख या डॉक्टरवर अनेक आरोप असतांना व वरोरा पोलीस स्टेशनं येथे त्यांच्याविरोधात तक्रारी असतांना त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत केलेली वागणूक निषेधार्य आहे त्यामुळे त्यांच्यावर निलंबानाची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मिर्ची लाव आंदोलनाच्या वेळी प्रशासनाला दिला आहे.