✒️संतोष लांडे पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.8 सप्टेंबर) :- महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे गणपती श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुणे येथे पहिल्या दिवशी हजारो भाविक भक्तांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचे दर्शन घेतले श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टने १३२ वर्षाचा इतिहास सांभाळत पारंपरिक पद्धतीने खूप छान असे डेकोरेशन केले होते यावर्षी छान असे मंदिराचे डेकोरेशन करण्यात आले आहे .
ज्यावेळेस रात्री विद्युतच्या रोषणाईमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा यांचे मंदिर झळक त्या वेळेला सर्व भाविक भक्तांचे डोळे विकून जातात ते दृश्य पाहिल्यानंतर मन कसे भारावून येते उगाच म्हणत नाहीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा नवसाला पावतो ते काल प्रत्येक क्षण अनुभवले बाप्पाच्या समोर उभा राहिल्यास असं वाटलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई समोर नव्हे तर स्वर्गात उभा ते सुख अनुभवात हजारो भाविक भक्त पहिल्याच दिवशी दर्शनास आले होते .
त्याच पद्धतीने इतर मंडळांनी सुद्धा खूप छान देखावे सादर केले व खूप छान असे डेकोरेशन सुद्धा केले होते पुण्यामध्ये गणपती बाप्पा दहा दिवस आले म्हणजे पुणेकरांना विघ्नहर्ता कधी सुद्धा माघारी जाऊ नये असेच वाटते म्हणूनच म्हणतात महाराष्ट्रात सर्वत्र खूप छान व आनंदमय वातावरण गणपती मध्ये कुठे असते तर ते पुणे शहरात जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया