✒️मनोहर खिरटकर(खाबांडा प्रतिनिधि)
खांबाडा (दि.26 ऑगस्ट) :-
वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील मोलमजुरी करणारे गरीब कुंटुबातील विठ्ठल आत्राम याचे एकुलती एक असलेली मुलगी काल रात्री सर्पदंशाने मरण पावली .
आप्तेस्टाच्या माहिती प्रमाणे वर्ग आठवीत शिकणारी वरोरा तालुक्यातील खाबांडा येथील रुचीता विठ्ठल आत्राम रक्षाबंधन साठी आपल्या चिमुर तालुक्यातील किटालि येथे मामाच्या गावी गेली असता.
काल रात्री झोपेत रुचिता विठ्ठल आत्राम हिला नाग जातीच्या सापाने चावा घेतल्याने तीला चिमुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यानी तिला मृत घोषीत केले ती सर्व भांवडात एकुलती एक असल्याने सर्वत्र शोककळा पसरली.






