✒️ संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.18 ऑगस्ट) :- राजस्थान जिल्हा दौसा येथील गोर गरीब तळागाळातील लोकांसाठी भारतभर अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे केंद्र शासनाचा बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम हाती घेऊन सर्वाँना सोबत घेऊन कार्य करणारे केंद्र सरकार मान्यता प्राप्त pay 2 pay सोशल फाऊंडेशनचे स्वतः दिव्यांग असणारे आणि दिव्यांगांसाठी सुध्धा अनेक उपक्रम राबविणारेफाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री प्रभु दयालजी शर्मा यांची त्यांच्या राजस्थान मध्ये जिल्हा दौसा येथील कार्यालयात मधु तारा फाऊंडेशन प्रमुख श्रीनितीनजी शिंदे यांनी उत्सुकता पूर्ण भेट घेतली. ही भेट pay 2 pay फाऊंडेशन सोबत जुळून महाराष्ट्रभरात गेल्या दोन वर्षापासून तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारे मा.श्री चंद्रकांतजी सरोदे साहेब यांच्या माध्यमातून घडली.या वेळी संस्थेसोबत नवीनच जुळलेले श्री गिरीषजी घाग साहेब सुध्धा उपस्थित होते.
आता पर्यंत सतरा राज्यात राबवित आहे तसेच संपूर्ण भारत भर बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रमराबविण्याचा मानस अत्यंत नम्र आणि आपल्या स्मित हास्यात श्री प्रभुदयाल शर्मा साहेब यांनी बोलून दाखविला तसेच आपण सर्वांनी सोबत राहून जर हे कार्य हाती घेतले तरच खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत हे कार्य पोहचेल असे म्हणाले.
मधु तारा महराष्ट पुण्यातून भेटीस आल्या बद्दल श्री शर्मा साहेब यांनी आनंद व्यक्त केला व सदैव सोबत राहून कार्य करू असे जाहीर केले.
या वेळी मधु तारा प्रमुख यांनी एक मेकां करू सहाय्य अवघे धरू सुपंथ या म्हणी प्रमाणे कायम सोबत राहून कार्य करू असे श्री नितीनजी शिंदे म्हणाले.