🔹वरोरा पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.23 जुलै) :-
वरोरा तालुक्यातील परसोडा या शुभम आमने यांच्या नेतृत्वमध्ये मागील चार पाच वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळ च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम रभविले जात होते. तेवढ्यात गावामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू ची विक्री सुरु झाली.गेल्या चार पाच वर्षापासून देशी दारू ची विक्री होत असून परसोडा गावातील पोलीस पाटील यांचे या घटने कडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे गावातील तरुण पिळी ही व्यसनाच्या आहारी जात आहे.
आणि गावामध्ये भांडणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्ते शुभम आमने यांनी पोलीस पाटील यांना निवेदन च्या माध्यमातूम गावातील देशी दारू ची विक्री थांबविण्याची विनंती केली आहे. अवैध रित्या देशी दारू ची विक्री थांबवा अन्यथा उपोषण करू अशी विनंती केली आहे.