सोनार हक्क परिषद विदर्भ महिला आघाडी सचिवपदी चंद्रपूरच्या माधुरी कटकोजवार नियुक्त

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.18 जुलै) :- उत्तर महाराष्ट्र सोनार हक्क परिषद संघटनेच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई शहाने यांनी सोनार हक्क परिषदेच्या सामाजिक व संघटनात्मक विदर्भ महिला आघाडी सचिव पदावर चंद्रपूर येथील जर्नलिस्ट माधुरी दीपक कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन)यांची सन्मानपुर्वक नियुक्ती केली आहे.

                 सोनार हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सतिष उर्फ राजेश पंडित यांच्या आदेशान्वये जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची सोनार हक्क परीषद महिला आघाडी विदर्भ विभागीय सचिवपदी नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती केल्या गेली आहे.

यापुढील काळात समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी तसेच सामाजिक सलोखा व संघटनात्मक बांधणी, त्याचबरोबर समाजाच्या सुख दुःखामध्ये सातत्याने आपण बरोबर राहून समाजाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने यापुढे आपल्या नेतृत्वामध्ये सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य) या सकल सोनार समाजासाठी सदैव कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनेला तळागाळापर्यंत नेण्याचे महान कार्य आपल्या हातून घडो व पुढील सामाजिक व संघटनात्मक समाजाकरीता उपयुक्त अपेक्षित कार्यासाठी माधुरी कटकोजवार यांचे नव्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करीत विश्वकर्मामय, नरहरीमय शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.