✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)
भद्रावती(दि.14 जुलै) :- शहरातील विजासन येथे राहणाऱ्या युवकांनी छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारला उघडकीस आली. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
सुभाष माधव बावणे वय ३२ वर्ष राहणार बुद्ध लेणी विजासन असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी व मुले त्याच्याजवळ दोन वर्षापासून राहत नव्हती तो दारूच्या आहारी गेला होता. घरीकोणी नसताना छताला दोर बांधून गळ्फास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






