असंख्य युवकांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्ष प्रवेश व नियुक्ति पत्र वाटप

Share News

🔹आम आदमी पार्टी युवा आघाडी ची तोफ राजू कुडे यांचा नेतृत्वात जिल्ह्यात धडकणार : भूषण ढाकुलकर प्रदेश संघटन सचिव आप

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि .3 जून) :- आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात आप जिल्हा आणि महानगर तर्फे भव्य पक्षप्रवेश तथा नियुक्ती प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या हल्लोषामध्ये चंद्रपूर येथील बी जी सेलिब्रेशन हॉल येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश संघटन सचिव भूषणजी जी ढाकुलकर यांनी उपस्थित मान्यवरांना पक्षाचे ध्येय धोरण आणि आम आदमी पार्टीची खरे पाहता गरज काय हे पटवून दिले.

 यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजू कुडे यांनी नवनियुक्त झालेल्या युवा पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागायचे व सत्ताधारी बीजेपी आणि विरोधक काँग्रेस याना यावेळी घरी बसवन्याचे काम करायचे आहे सांगितले आहे , केजरीवाल यांचे काम घर टॅक्स हाफ, नळ बिल माफ, मोफत शिक्षा, स्वास्थ इत्यादी कामे जनते पर्यंत पोहचवने अशी विनंती त्यांनी केली सदर कार्यक्रम वेळी संचालन जावेद सय्यद अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष यांनी केले.

यावेळेस सुनील मुसळे वरिष्ठ नेता, जिल्हा अध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री शंकर सरदार, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरहेकर, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, जिल्हा सचिव राज नगराळे, जिल्हा विधि सल्लागार एड. किशोर पुसलवार, जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सदस्य परमजीत सिंह झगड़े, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर अध्यक्ष तबस्सुम शेख, संघटन मंत्री संतोष बोपचे, बल्लारपुर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, सोनल पाटिल, सुनील सदभैया, जितेंद्र भाटिया, अनूप तेलतुंबड़े, मनीष राउत, आदित्य नन्दनवार, जयदेव देवगड़े, फहीम शेख, शशिकांत मेश्राम, रणजीत बोरकुटे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Share News

More From Author

जबड्या चा कॅन्सर रोखण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळा….डॉ. मंगेश गुलवाडे

ST वर्कशॉप चौक येथे होणाऱ्या अपघात रोकण्याकरिता गतिरोधकांची आपच्या योगेश गोखरे यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *