चंदनखेडा येथील तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाहबद्ध

🔹प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला आदर्श गावात प्रेम विवाह

🔸दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10 मे) :- 

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चंदनखेडा येथील राहुल गोपिचंद कांबडे (२६) व फिश मार्केट जवळ बिनबा वार्ड चंद्रपूर आरती रविंद्र वानखेडे (२८) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.

दिनांक ०८ मे २०२४ ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलीचे आई वडील व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलिच्या आई वडीलांन कडुन देण्यात आल्या. व त्यांचा विवाह ९ मे २०२४ ला. सायंकाळी ७.४५ ला.विवाह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान चंदनखेडा येथे गावातील पंचासमक्ष लावून दिला.

यावेळी मुलीचे वडिल रविंद्र वानखेडे,आई राधाबाई वानखेडे,मुलाची आई कासाबाई गोहणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, सामाजिक कार्यकर्ते सिंगलदिप पेंदाम, शाहरुख पठाण,प्रभाकर दोडके, दिलिप कुळसंगे, सुशिला हनवते,गंगुबाई शेरकुरे, सोनाबाई खडसंग, पोलिस पाटील समिरखान पठाण, तंटामुक्त समिती सदस्य, छाया घुगरे, मनोहर घुघरे,बशीर शेख, मिलिंद पांढरे,लोकेश कोकुडे, अमृता कोकुळे, सोनाली मुडेवार,मनिषा बारस्कर.

सविता सोनुले, सुनंदा गेडाम , कविता गोहणे, मंगला वाटेकर, ज्योती बाटबरवे,छाया सोनुले,दिवाकर गोहणे,होमराज घुमे,राजु वझे,दिनेश कोकुडे, मंगेश हनवते , राकेश सोनुले,शंकर दडमल, देवानंद दोडके, अनिकेत बुरेवार, अमोल महागमकार, बालाजी महागमकार, अशोक पोहीनकर, गोरक्षनाथ गोहणे, चरणदास बागेसर, वसंत नन्नावरे, देवानंद पांढरे,सुरज भोयर,राहुल कोसुरकार, दिलिप ठावरी,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली.