विमा धारक शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या…रवींद्र गेजीक

🔹किसान युवा क्रांति संगठना ची मागनी 

🔸किसान युवा क्रांति संगठना चंद्रपुर जिला प्रमुख रविंद्र गेजीक याच्या नेतृत्वात 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .7 डिसेंबर) :- अवकाळी पावसामुळे धान् पिकाचे नुकसान झालेल्या सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांना सरसकट पिक् विमा देण्यात यावा यासाठी तालुका कृषी अधिकारी मोहिनि जाधाव याच्या कड़े भद्रावती तालुक्या तिल कोकेवाडा मानकर येथील शेतकऱ्यांचे निवेदन सादर.

दिनांक 27 व 28 रोजी जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भद्रावती मधिल् धान् उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे धान उत्पादक शेतकरि आर्थिक अडचणीत पडला आहे अश्या परिस्तिथीमुळे शेतकरी खचून गेला आहे.

त्यामुळे ज्या शेयकऱ्यांनी धान् पिकाचा विमा काढला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळावा यासाठी कोकेवाडा मानकर येथील शेतकऱ्यांनी मा.तालुका कृषी अधिकारी भद्रावती जाधव मॅडम यांना निवेदन सादर केले यावेळी ग्राम पंचायत् सदस्य रोशन मानकर ,श्रीकृष्ण मानकर विकास गजभे,कुंदन मानकर,मुकेश मानकर ,रवींद्र दडमल ,विशाल झाडें बिटू बोहरा,श्रीकृष्ण घोडमारे,सोनू मानकर उपस्थित होते.