प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या प्रयत्नातून सावरी ते गुजगव्हान रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले

Share News

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.23 डिसेंबर) :- चिमूर तालुक्यातील सावरीते गुजगव्हान रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती . त्यामुळे या रस्त्याने ये -जा करणाऱ्या शेतकरी शेतकरी शेतमजूर व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.सदर रस्त्यावरील गिट्टी उसळलेली होती‌. त्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले होते .जाणारया शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता असा प्रश्न पडला होता.

याबाबत प्रहार सेवक विनोद उमरे यांनी या रस्त्यांचे दुरवस्था लक्षात घेत. माझी जि.प.अध्यक्ष सध्या ताई गुरुनले यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.त्यामुळे याची दखल घेत अखेर ५००मीटर रस्त्याचे सावरी ते गुजगाव्हान रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले .तर प्रहार सेवक विनोद उमरे यांनी शासन दरबारी प्रश्न मांडत होते . अखेर प्रशासनाने व याबाबत दखल घेत खानगांव ते सावरी (बिड) रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या मागणीला यश आले.

Share News

More From Author

विमा कंपनी अधिकाऱ्याला खडसावले ..

साईबाबा एक ईश्वरी अवतार लघुनाटिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *