निशा फूड प्रोडक्ट(Nisha Food Products) ला भीषण आग

Share News

🔸पूर्ण मशनरी जळून खाक किसान नगर येथील घटना

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.4 ऑक्टोबर) :- सावली तालुक्यातील किसान नगर मध्ये असलेल्या निशा प्रोडक्ट इथे पींगर, चिप्स व कुरकुरे तयार करणाऱ्या फॅक्टरीला दोन ऑक्टोबरला पहाटेचे तीन च्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्यामुळे पूर्ण मशनरी जळून खाक झाल्यामुळे फार मोठी नुकसान झालेली आहे .

निशा प्रदीप सुरे किसान नगर येथील महिलेने एक रोजगार उपलब्ध व्हावा करिता नुकताच एप्रिल मध्ये सदर कारखाना सुरू करण्यात आला मात्र आग लागल्याने मोठी नुकसान झाले असून जवळ पास अंदाजे चाळीस लाख आर्थिक नुकसान झाले वरील घटनेची चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात मागणी होत आहे.

Share News

More From Author

दुचाकी झाडावर आदळून तरुणाचा अपघाती मृत्यू

जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांचे मोलाचे मार्गदर्शन व अवयव दानाची शपथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *