शेतात काम करीत असता महिलेवर अतिप्रसंग

Share News

चारगाव येथील घटना 

 ✒️ शेगांव(विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव (दि.21 डिसेंबर):-वरोरा तालुक्यातील चारगाव बू येथे दिनाक २० रोज मंगळवार ला शेतात काम करिता असता बाहेर गावातून आलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याची घटना उघडकीस आली असल्याने गावात परिसरात खळबळ उडाली आहे… 

        सविस्तर असे की चारगाव बू येथील युवा शेतकरी देवानंद मसराम यांच्या शेतामध्ये अर्जुनी येथील पती पत्नी शेतात पाईप गोळा करीत होते . 

       दरम्यान आरोपी देवानंद मसराम यांच्या मनात कुकर्माचे विचार निर्माण झाल्याने पीडित महिलाच्या पतीला काही कारणाने निमित्त सांगून गावात पाठवले . पती गावात गेला असल्याची संधी साधून पीडित महिलेला शरीर सुखाची मागणी केली तेव्हा पीडित महीलेनी यावर पूर्णपणे नकार दिला असल्याने संतापाने आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करून तिच्यावर अतिप्रसंग केला . हा सर्व प्रकार तिच्या पतीने पाहायला . व कुकर्मी नराधमाला आपल्या पत्नीच्या अंगावरून बाहेर ढकलले. तेव्हा नराधमाने आपला पळ काढला.

तेव्हा पिडीत महिला व तिचा पती सरळ शेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली तेव्हा येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी याची चौकशी करिता आरोपीला अटक करून ताब्यात घेतले . व अ प क्र. ३२५ / २२ कलम ३७६ भांदवी गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री अविनाश मेश्राम ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली pai श्री प्रवीण जाधव करीत आहे .. सदर या गुन्ह्याचा तपास कडेकोट सुरू असून यात शेगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी अधिक गांभीर्याने लक्ष देत आहेत .

Share News

More From Author

टेकाडी (दिक्षीत) ग्रामपंचायत, वायगाव रयतवारी गट ग्रा.प. तथा चारगाव तेलवासा ग्रामपंचायत येथे संस्थेचे कार्यवाहक विजयी

सम्मेद शिखर तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ घोषित करण्यास जैन समाजाचा विरोध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *