*जय हिंगलाज माता*अभिनेत्री कल्पना भावसार ,( ज्ञानेश्वर माऊली फेम) यांनी अल्प काळात सिनेसृष्टी मध्ये आपला ठसा उमटवला Jai Hinglaj Mata*Actress Kalpana Bhavsar, (of Dnyaneshwar Mouli fame) made her mark in the film industry in a short span of time

Share News

✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

 पुणे (दि. 4 मे ) :- 

          येथील सिने अभिनेत्री कल्पना भावसार यांनी अल्प काळात सिनेसृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवला व सिनेसृष्टी मध्ये खूप कमी वर्षात खूप जास्त कामे केल्यामुळे मिडीयाला त्यांची दखल घ्यावी लागली . त्यानी मराठी , हिंदी चित्रपट, सिरीयलस, व्यावसायिक नाटक केली.

सिनेसृष्टीत संघर्षमय प्रवास करीत होत्या .कोणाचाही पाठिंबा नसताना त्यांनी सिनेसृष्टी मध्ये आपले भविष्य करण्याचे मनाशी ठरवले इंडस्ट्रीमध्ये साधी ओळख ही नव्हती पण देवावर पूर्ण विश्वास होता आपल्या स्वप्नांच्या व जिद्दीच्या जोरावर अभिनेत्री कल्पना भावसार यांनी देवा एक संधी दे ,मी खूप काही करेल. परमेश्वराने त्यांचे विनवणी ऐकली.आणि सर्वात पहिला सिनेम दादा कोंडके प्रोडक्शन , मला एक चानस हवा, हा पहिला सिनेमा त्यांनी केला.

तेव्हापासून  त्यांचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये धुमधडाक्यात आगमन झाले व यश ही मिळत गेले. हे यश सहजा सहजी मिळाले नाही, त्यासाठी खुप मोठा संघर्ष,कष्ट त्यांना करावे लागले त्यांचे आतापर्यंत मराठी चित्रपट दणक्यावर दणका ,मॅरेथॉन जिंदगी, अंतरवेली”, त्राटक, “इपितर”, “सासरची साडी, “बुधवार पेठ” ,”आमचं लग्न होईल का ?” “येडू आईच्या नावानं चांगभलं” , “बनौ मा की महिमा,लहर ,विनाकारण राजकारण ,उसाण ,वर्तमान , अशा विविध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक विविध भूमिका रंगवल्या त्यासह मराठी मालिके मध्येही छोटे मोठे रोल त्या करीत आहेत .

दूर्वा ,संघर्ष ,आम्ही कारभारीन आणि संघर्ष मिलनाचा , ज्ञानेश्वर माऊली या मराठी टीव्ही सिरीयल मध्ये आपली अभिनयाची चमक दाखवली .हिंदी चित्रपट ” परफेक्ट प्लॅन मधे “डॉन चाची”ची भूमिका खूप छान साकारली आहे, रॉबिन हुडके पोते या हिंदी चित्रपटांमध्ये ही भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली.

 तसेचअनेक महानाट्य मध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवला शंभुराजे यात सोयराबाई ,साई दरबार, यात बायजाबाई चा रोल अप्रतिम आजही करत आहे. शिवराज्याभिषेक , जाऊ देवाचिया गावा, अशा अनेक महानाट्य मधून त्यांनी मायबाप प्रेक्षकांची वहा वहा मिळवली.तसे त्यांनी नागपूरची झाडीपट्टी येथील 3 वर्ष 100 पेक्षा जास्त लाईव्ह स्टेज नाटक केली. 

पुढे त्यांच्या कामाची व भूमिकेची दखल घेऊन महाराष्ट्रातून त्यांना कलारत्न पुरस्कार अहिल्याबाई होळकर पुरस्कार , साई कला रत्न पुरस्कार, कला हिरकणी पुरस्कार असे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सातत्याने कार्यरत आहेत.

 प्रमुख्याने त्यांना प्रेमळ आई साहेब,खतरनाकआणि सासूबाई ,अक्काबाई, डॉन चाची अशा अनेक भूमिकेसाठी विचारले जात आहे , जास्त मागणी होत आहे कुठल्याही रोल मध्ये त्या परफेक्ट भूमिका करतात , मराठी चित्रपट समाज प्रबोधन व संदेश देणारे, कौटुंबिक भूमिका करण्यास त्या प्राधान्य देतात ,आजपर्यंत त्यांनी अनेक चित्रपट ,मालिकेतून आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे .

कोणतीही हार न पत्करता जोमाने अभिनय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी पक्की जिद्द ठेवून आल्या होत्या सद्या नावाजलेली सिरीयल सोनी मराठीवरील ,ज्ञानेश्वर माऊली” 413 414,full apisode महाएपिसोड यूट्यूब वर आहे. यात ग्रामीण आईची भूमिका आहे.  

अभिनेत्री कल्पना भावसार ( ज्ञानेश्वर माऊली फेम सिरियल ) त्यांनी पाहिलं, अनुभवलं व जिंकलं असेच म्हणावे लागेल, तसेच त्यांनी एक शॉर्ट फिल्म केली आहे गुप्तधन यात त्यांनी लीड रोल केला आहे.डेडली सेवन डेज,ह्या हॉरर हिंदी चित्रपटामध्ये मेन लीड रोल केला आहे. पुढील करियर साठी त्यांना आपण सर्वान तर्फे हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्त्या भावसार एकता फाउंडेशन च्या अभिनेत्री कल्पना भावसार यांना महाराष्ट्र सेना आघाडी डायरेक्टर दीपक मस्के सरांनी त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना संभाजी नगर येथे प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान केला तसेच कला गौरव पुरस्कार दिनांक एक मे 2023 रोजी प्रदान करण्यात आला. त्याचे सर्वांचे ही मनापासून, धन्यवाद, धन्यवाद,

मुख्य संपादक : मनोज गाठले 

संपर्क .9767883091

Share News

More From Author

आजीची शाळा संस्कार वर्ग Grandma’s School Sanskar Class

‘त्या’ शेळ्यांची निवड लाभार्थ्यांच्या आवडी-निवडी नुसारच The choice of ‘those’ goats depends on the preferences of the beneficiaries

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *