🔸जुन्या नगरपंचायत च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे लघु शंका गृह मुतारी जळाले टीन शेडचे कॉम्प्लेक्स नगरपंचायत बचावली
✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.15 जून) :-
माहूर शहरातील जुन्या नगरपंचायत च्या मागे असलेल्या खुल्या जागेत ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या मुतारी लघु शंका गृहला आग लागल्याने नगरपंचायत चे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून वेळीच आग विझवली अन्यथा टीन शेडचे कॉम्प्लेक्स व नगरपंचायत ला आग लागली असती तर , नशीब बलवत्तर तर म्हणून नागरिक तिथे लघवीला जातात त्यांना कुठलीही हानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना दि 14 रोजी दुपारी 2.00 वाजता घळली आहे.
माहूर शहराच्या तापमानाने कमालीचा उच्चांक गाठला असून जंगलात अनेक ठिकाणी आगी लागून करोडो रुपयांची वनसंपदा स्वाहा झालेली आहे तर अनेक ठिकाणी किरकोळ आगी लागलेका आहेत जुन्या नगरपंचायत ला लागून टीन शेडचे कॉम्प्लेक्स बनवण्यात आले त्याच्या बाजूला जुन्या अंगणवाडीच्या मागे मोकळी जागा असून तेथे नागरिक कचरा टाकतात तर अनेक नागरिक येथे लघु शंका करतात त्यामुळे नगरपंचायतने येथे प्लास्टिकचे दोन लघु शंका गृह ठेवले होते येथील कचऱ्याला आग लागल्याने एक लघु शंका गृह जळाले नागरिकांनी सदरील घटना नगरपंचायत ला कळविल्याने बुलेट फायर वाहनाने कर्मचाऱ्यांनी येऊन सदरील आग आटोक्यात आणली अन्यथा दुसरे लघु शंका गृह पेटले असते तर जुनी नगरपंचायत टिन शेड चे कॉम्प्लेक्स आणि इतर मालमत्ता जळून स्वाहा झाल्या असत्या.
नगरपंचायत ची मोठी अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने शहरात किंवा इतर ठिकाणी मोठी आग लागल्यास पूर्ण मालमत्ता जळून खाक झाल्या तरीही आग विजविने शक्य नाही त्यामुळे नगरपंचायत कडून मोठे अग्निशमन वाहन तात्काळ दुरुस्त करून शहरातील अनेक ठिकाणी जमा असलेला कचरा व इतर वस्तू तात्काळ स्वच्छ करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.







