✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.2 जून) :-
वरोरा तालुक्यातील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा* येथील अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक अंतर्गत दिंदोडा (खु.) येथे दाखल झाले असून, ग्रामपंचायतीच्या (गट) वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये कृषीदुत *विक्रम सावसाकडे, राहुल झाडे, सचिन सावले, शुभम झरेकर व उदय राऊत* यांचा समावेश असुन तीन महिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांना विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. त्यात माती व पाणी परिक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व किड यांचे व्यवस्थापन.
जनावरांची काळजी व संगोपन शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण,बिजप्रक्रीया या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.या प्रसंगी *सरपंच मा.श्री. गुणवंत ठेंगणे व पोलिस पाटील मा. श्री सचिन पिंपळकर* यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले.
या ग्रामीण कार्यक्रमाकरीता कृषी महाविद्यालयाचे *प्राचार्य मा.श्री. डॉ. सुहास पोतदार, कार्यक्रम प्रभारी मा.श्री. डॉ .आर .वि. महाजन , कार्यक्रम समन्वयक मा.श्री. डॉ. आर. तायडे, कार्यक्रम अधिकारी मा.श्री. डॉ. एम. पातोंड़ व मा.श्री. डॉ. एस. इमडे* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.







