जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्ताने अँटी रेबीज लसीकरण शिबिर संपन्न

🔸पशुवैद्यक: अन्न व आरोग्याचे संरक्षक

✒️सौ. सुवर्णा बेले राजुरा(Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.25 एप्रिल) :-

       पशुसंवर्धन विभाग राजुरा अंतर्गत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय राजुरा येथे जागतिक पशुवैद्यकीय दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर दिनाचे औचित्य साधून डॉ. नरसिंग पंढरीनाथ तेलंगे ,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुक्यातील श्वानांचे मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरास डॉ.भाग्यश्री बेलसरे ,पशुधन विकास अधिकारी विरुर स्टेशन, डॉ. दीपक नागले, पशुधन विकास अधिकारी विस्तार राजुरा , पशुधन पर्यवेक्षक परमेश्वर राठोड,आदित्य बोबडे, अनिल चव्हाण व तालुक्यातील इतर कर्मचारी उपस्थित होते. 

सदर शिबिरात शंभरपेक्षा जास्त श्वानांना मोफत लसीकरण करण्यात आले . सदर रेबीज लसीकरण करण्यामागे महत्त्वाचे उद्देश म्हणजे राजुरा तालुक्यातील गाय वर्ग ,म्हैस वर्ग व शेळी वर्ग तसेच सर्व मोकाट व पाळीव श्वानांना रेबीज या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करणे हे होते. यावेळी श्वान प्रेमींनी मोठ्यसंखेने अँटी रेबीज लसीकरण शिबिराचा लाभ घेतला.