पोखरी वि.स.से.सो.कडून पीककर्ज वाटपास प्रारंभ

🔸पोखरी संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना दिलासा

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.19 एप्रिल) :-

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, यवतमाळ अंतर्गत काळी (दौ.) शाखेशी संलग्न पोखरी (ई.) येथील ग्राम विकास सहकारी सोसायटी मार्फत महागांव तालुक्यांत पीककर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते तसेच मशागतीसाठी आवश्यक साधन सामग्री वेळेवर घेता यावी, यासाठी संस्थेच्या वतीने आर्थिक निधी वेळेत उपलब्ध करण्यात आला. ‌ शेतकरी हिताच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आल्याने पोखरी सोसायटी अंतर्गत सभासदांमधून आनंद व्यक्त होत आहे.

प्रारंभी टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना तातडीने उत्साहात पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत सुरू करण्यास मदत होत होणार आहे. कर्ज वाटपामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या उपक्रमासाठी पोखरी संस्थेचे प्रशासक अशोक थोरात, सचिव श्रावण जाधव, कर्मचारी विनोद पवार,सभासद जयभीम मुनेश्वर, अमोल पांडोळे यांचे सहकार्य लाभले. तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक पवन चव्हाण, कॅशियर अफताफ पटेल, लिपिक वैशाख राठोड यांनीही कर्ज वितरण प्रक्रियेत सहभाग नोंदविला. तालुक्यातून शेतकरी हिताचे उत्कृष्ट निर्णय घेणारी सहकारी संस्था म्हणून पोखरी सोसायटीकडे पाहिले जात आहे.