राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली जिल्हा तर्फे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा भव्य सत्कार

✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी) 

गडचिरोली(दि.24 जानेवारी) :- 

गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हा तर्फे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार तथा महायुतीचे शिल्पकार मा. श्री डॉ. मिलिंद साहेब नरोटे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री रविंद्र भाऊ वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव मा. श्री लौकिक भाऊ भिवापूरे, प्रदेश सचिव मा. श्री रिंकू भाऊ पापडकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष मा. श्री विवेक भाऊ बाबनवाडे, जिल्हा सचिव मा. श्री कपिल भाऊ बागडे, गडचिरोली शहर अध्यक्ष मा. श्री अमोल भाऊ कुलमेथे, तालुका उपाध्यक्ष मा. श्री प्रमोद भाऊ उमरगुंडावार, तालुका सरचिटणीस मा. श्री सुधीर भाऊ मडावी, गडचिरोली माजी नगराध्यक्ष मा. श्री प्रमोद भाऊ वैध, नगर परिषद नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अंजुम ताई सय्यद, विधानसभा कार्याध्यक्ष सौ. सुषमा ताई येवले, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. उमा ताई बनसोड, OBC उपाध्यक्षा सौ. किरण ताई मंगरे, मा. श्री फुलझले भाऊ, कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली संचालक मा. श्री रामदास भाऊ पीपरे, सौ. नेहा ताई सय्यद, मा. श्री विजू भाऊ धकाते, मा. श्री माजीद भाऊ शेख तसेच इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाचे व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.