🔹नगरपरिषदेला मिळाले सक्षम नेतृत्व
✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.22 जानेवारी) :-
अनिल कुनघाळकर हे नगरपरिषदेतील अनुभवी, अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली असून, त्यांच्या कार्यकाळात शहरातील अनेक महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली आहेत. नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रभावी व सकारात्मक भूमिका बजावली आहे.
नगरपरिषदेत दीर्घ अनुभव, प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांची बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाला सक्षम आणि गतिमान नेतृत्व मिळाले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना अनिल कुनघाळकर म्हणाले,
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांचे बांधकाम, नाले व गटारी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच नागरी सोयी-सुविधांच्या विकासात गुणवत्ता व पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. शहराच्या विकासात कोणतीही तडजोड न करता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.







