🔹सीमा नरवाडेंच्या सामाजिक बांधिलकीचे प्रभागातून कौतुक
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.17 जानेवारी) :-
महागाव शहरातील प्रभाग क्रं. १३ मधील नागरिकांसाठी सांडपाणी वाहून जाण्यासाठी, स्वच्छतेसाठी नालीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रलंबित असलेला २५ मीटर नालीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. प्रभागातील नागरिकांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरली.
महागाव खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सीमा नितीन नरवाडे यांच्याद्वारे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन स्वतःच्या स्वखर्चातून सदर नालीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. सार्वजनिक जीवनात राजकारणापेक्षा समाजकारण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सहसिमताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र. १३ मधून अत्यल्प मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला असतानाही त्यांनी कधीही खचून न जाता, “आपल्या प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा पूर्णपणे झाल्याच पाहिजेत” या ठाम भूमिकेतून विकासकामांना प्राधान्य दिले. प्रभागातील या नालीच्या बांधकामामुळे परिसरातील पाणी साचण्याची समस्या, दुर्गंधी तसेच आरोग्य विषयक अडचणी कायमच्या सुटणार आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणा होणार आहे. या कामासाठी महागाव नगरपंचायतचे काँग्रेस पक्षाचे गटनेते तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून समन्वयाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सीमा ताईंच्या योगदाना मुळे हे विकास काम प्रत्यक्षात साकार झाले.
यावेळी महागाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ कदम,खरेदी-विक्री संघाचे संचालक रावसाहेब नरवाडे, विजयराव कदम, दत्ता बापुराव नरवाडे,विलास देवसरकर,संतोष कोल्हेकर, किसनराव नरवाडे, संतोष पहुरकर, रवी खंदारे, कैलास भरवाडे, सदानंद नरवाडे, गजानन कदम यांच्यासह प्रभाग क्र. १३ मधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







