🔸लाइट्स मेटल्सचा निर्णय
✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली (दि.3 जानेवारी) :-
स्थानिक तरुणांच्या करिअरच्या तयारीला सर्वोच्च प्राधान्य देत लाइट्स मेटल अँड एनर्जी लि. या कंपनीने यंदाची जिल्हा प्रीमियर लीग GDPLस्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तरुणांना सरावासाठी मैदान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचण्यांची तयारी सुरू असून अनेक युवक रोज मैदानावर धावणे, व्यायाम व सराव करत आहेत. अशा वेळी स्पर्धांमुळे मैदान उपलब्ध न झाल्यास तरुणांच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन कंपनीने सामाजिक जबाबदारीतून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
लाइट्स मेटल्सच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, क्रीडा स्पर्धांपेक्षा तरुणांचे भवितव्य आणि करिअर अधिक महत्त्वाचे असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. स्पर्धा पुढील योग्य वेळी आयोजित करण्यात येईल, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.







