🔹प्रशिक्षण दिले रोजगार कोण देणार
✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.2 जानेवारी) :-
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी 11 महिन्याचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे मात्र त्यांना पुढे कोणताही रोजगार मिळालेला नाही .जुन्या प्रशिक्षणार्थींच्या भविष्याचे सोय केल्याशिवाय नव्या प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देऊ नका, अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे . निवेदनात म्हटले म्हटले आहे की तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते की प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देऊ आम्ही प्रशिक्षणाचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने पूर्ण केला.
मात्र शासनाने आमच्या भविष्याचा विचार अजूनही केलेला नाही सुशिक्षित आणि प्रशिक्षित बेरोजगारावर उपासमारीची वेळ आली असून शासनाने आमच्या प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केलेली आहे . यावेळेस उपस्थित जिल्हा संघटनेचे सचिव पंकज नैताम , देवेंद्र शुद्धलवार, सुधाकर चुधरी , सोनाली अंबाडे , अंकित पितुलवार्, उपस्थित होते.







