✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.28 डिसेंबर) :-
श्री संताजी भवन, गडचिरोली येथे श्री संताजी जगनाडे महाराज च्या ४०१ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संयोजक विकास मधुकर कांबळे व आयोजक अविनाश चंद्रशेखर कायरकर यांच्या तर्फे करण्यात आले होते या रक्तदानाचे उद्घाटन नवनिर्वाचीत नगराध्यक्ष ॲड सौ. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर), नगरसेवक अनिल कुनघाडकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक योगिता प्रमोद पिपरे, नगरसेवक कोमल छत्रपती नैताम, नगरसेवक शिल्पा गव्हारे (हेमके), नगरसेवक साक्षी बोलुवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. रक्तदात्यानी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देऊन रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक विकास मधुकर कांबळे व आयोजक अविनाश चंद्रशेखर कायरकर यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कार्यक्रम समारंभात गडचिरोली रक्तकेंद्राचे रोहित बोमनपल्लीवार यांनी त्यांचे पुष्गुच्छ व भेटवस्तु देऊन आभार मानले. तेली समाजातील या सामाजिक जाणिवेबद्दल सर्व उपस्थित तेली बांधवांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व पुढे जाऊन पण असेच समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात यावे जेणेकरून गरजूंना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची कमी पडू नये यावर एकमत झाले.
रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी भांडेकर, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास तेली समाजाच्या प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के,प्रा. देवानंद कामळी, अॅड. रामदास कुंघाडकर, बाबुराव कोहडे,रवींद्र निंबोरकर, राहुल भांडेकर, विकास मधुकर कांबळे, महेंद्र लटारे, रवीन्द्र कांबळे, रमेश कांबळे, अविनाश कायरकर, गोपीनाथ चांदेवार, विष्णूजी कांबळे,प्रफुल आंबोरकर, भैयाजी सोमनकर, कुणाल भांडेकर, घनश्याम लाकडे,भगवान ठाकरे, रवींद्र ठाकरे या सर्व प्रतिष्ठित नागरिकांसह हजारो तेली समाज बांधव उपस्थित होते.







