नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदाची बँक प्रतिनिधी म्हणून निवड ; संजय राठोड

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.21 डिसेंबर) :- 

      तालुक्यांतील पेढी (ई.) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदाची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बँक प्रतिनिधी साठी निवड करण्यात आली आहे. ही निवड सहकार विभागाच्या नियमाला अधीन राहून करण्यात आल्याने या मध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नसल्याचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

   पेढी (ई.) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद अर्पित संजय राठोड हे नियमित सोसायटीचे कर्जदार असून ते नियमा प्रमाणे सोसायटीचे कर्ज नियमित परतफेड करत असतात. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळकडे पाठविण्यात येणाऱ्या बँक प्रतिनिधी म्हणून सोसायटीचे सभासद व नियमित कर्ज परतफेड करणारे अर्पित राठोड यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड बहुमताने करण्यात आल्यामुळे यामध्ये कुठल्याच प्रकारचा गैरव्यवहार किंवा नियमबाह्य प्रकार घडलेला नाही.

सातघरी येतील रमेश बाबुलाल राठोड हे बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे कर्मचारी सध्या सेवानिवृत्त झाले आहे. तरी देखील त्यांनी दहा ते बारा वर्षां पासून विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्ज भरले नाही. त्यांच्या घरातील इतर सदस्यावर देखील सोसायटीच्या कर्जाचा बोजा आहे. फक्त बदनाम करण्याच्या उद्देशाने बँक प्रतिनिधी महणून निवड केलेल्या अर्पितची तक्रार सहकार विभागा कडे केली असून ही निवड सहकार विभागाच्या नियमा प्रमाणेच करण्यात आलेली आहे. यात कुठल्याच नियमाला धाब्यावर बसविण्यात आलेले नाही. सहकार विभागाच्या नियमा प्रमाणे सदस्य जर थकबाकीदार असेल तर त्यांना मतदानाचा अधिकार देखील बजावता येत नसल्याचे नमूद आहे. झालेली निवड ही सर्व तथ्याला धरून असून यात निवड करतांना कुठल्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजय राठोड यांनी सांगितले.

 

 पेढी (ई.) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नियमित कर्ज भरणारे सभासद अर्पित राठोड यांची जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ बँक प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड करण्यात आली. ही निवड सर्व सभासदांना विश्वासात घेऊन करण्यात आल्याने नियमाला सोडून कुठलीही निवडीची प्रक्रिया करण्यात आली नाही.    संजय दौलत राठोड

 अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित पेढी ता. महागाव जिल्हा यवतमाळ