🔸पथनाट्य सादरीकरणातून जागृती
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 नोव्हेंबर) :-
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त महागाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती मुलींच्या निवासी वस्तीगृहाच्या वतीने भव्य पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. संविधान मूल्ये, सामाजिक जागरूकता आणि नागरिकांचे कर्तव्य यावर आधारित पथनाट्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच समाज बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रास हार अर्पण करून मानवंदना दिली.या वेळी रामराव पाटील नरवाडे,शैलेश कोपरकर, सागर पाईकराव,धम्मानंद कावळे, सुशील गावंडे, सुरज नरवाडे, बंटी कावळे, बाळू पाटील नरवाडे, यशवंत कावळे, अमोल राजवाडे, गजानन पाईकराव, गणेश भोयर,फराज पठाण,अमोल चिकने, देवराव हारणे, अनिरुद्ध कावळे, जयंत चौधरी आदी मान्यवरांची प्रसंगी उपस्थिती होती. समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती वस्तीगृहातील अधिकारी व शिक्षक वृंदातून अधीक्षक एम.बी.भोयर,पी.व्ही. पराते,आर.एन.मोरे,एस.आर. गुरुकुले, स्वाती स्वामी, राणी राठोड, स्मिता भोणे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.पथनाट्य सादरीकरण करणाऱ्या मुलींमध्ये जानवी हिंगडे, अनुष्का कावळे,समता कांबळे, सुहानी सोळंके,गुंजन इंगोले,रिया खडसे यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. संविधानावर आधारित संदेश प्रधान पथनाट्या द्वारे समाजात जागृतीचा संदेश पोहोचविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीण कावळे यांनी पार पाडले.







