जि. प. च्या भोजंती तलाव प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा

🔸चिमुकल्यांनी सादर केले बालविवाह प्रतिबंध जनजागृती पथनाट्य

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

शेख(दि.27 नोव्हेंबर) :- 

जिल्हा परिषदच्या भोजंती तलाव शाळेत बुधवार दि. 26 नोव्हें. रोजी संविधान दिन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी अपूर्वा आराध्ये व तीच्या सहकारी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालविवाह प्रतिबंध जनजागृती पथनाट्याला उपस्थित मान्यवरांनी टाळयांच्या गजरात प्रतिसाद दिला.

   संविधान दिनानिमित्त संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तकाचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांनी संविधानाची माहिती विशद केली. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, अपील बेलखोडे, इलियास बावाणी, राज ठाकूर,सिद्धार्थ तामगाडगे, संजय बनसोड, सुरेखा तळणकर,पेंटर सुरेश आराध्ये यांचेसह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचलन मुख्याध्यापक सिद्धार्थ सोनकांबळे यांनी केले, तर अशोक चव्हाण यांनी आभार मानले.भारतमाता की जय व संविधान जिंदाबाद च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढली.