✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर (दि.23 नोव्हेंबर) :-
किनवट शहरातील स्वर्गीय मुतम्माबाई नरसिंमलू माडपेल्लीवार राहणार साठे नगर किनवट यांचे दि 23 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले.
दि 23 रोजी सायंकाळी चार वाजता त्यांचे वर साठे नगर येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांचे पश्चात दोन मुलं दोन मुली नातू पणतू असा परिवार असून माहूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी नारायणराव माडपेल्लीवार यांच्या त्या आई होत्या तर पत्रकार अनिल माडपेल्लीवार यांच्या त्या आजी होत्या.







