दोन ज्वेलर्स दुकान फोडून अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

🔹चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

🔸दोन दुचाकीची ही चोरी हिवरा (संगम) येथील घटना

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.23 नोव्हेंबर) :- 

पोलीस स्टेशन महागाव हद्दीत येत असलेल्या असलेल्या हिवरा (संगम) येथील मेन बाजार लाईनला असलेले खंडेलवार ज्वेलर्स व साई ज्वेलर्समध्ये अज्ञात चोरटयांनी शुक्रवारी २१ रात्री ०३:३५ दरम्यान फोडले,चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पूर्ण तोंड रुमालाने बांधून असल्याचे दिसत आहे. खंडेलवाल यांच्या दुकानाचे चैनल गेटला असलेले शटर मेन गेटचे कुलूप फोडून चोरट्याने आत प्रवेश केला. तेथील दुकानाच्या काउंटर मधील चांदीचे कडे दोन नग,चांदीच्या अंगठ्या ७० नग लहान मुलाच्या हाताचे चांदीचे कडे,चांदीची एक पोत, सोन्याच्या नाकातील बेसर, या सर्व मला सह नगदी ९००० रुपये एकूण रक्कम अंदाजे आजच्या बाजारभावा प्रमाणे अडीच लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

तर अमित शरदराव शहाणे यांचे साई ज्वेलर्सच्या दुकानाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना आत मध्ये असलेली तिजोरी फोडल्या गेली नसल्यामुळे ज्वेलर्स मधील चिल्लर पैशावर समाधान मानावे लागले. येथील भुसार व्यापारी बाबाराव कदम यांच्या घरासमोर असलेली पल्सर कंपनीची दुचाकी व किरण जामकर यांच्या घरासमोर असलेली त्यांच्या कामगारांची पल्सर दुचाकी सुद्धा चोरीला गेली. खंडेलवाल त्यांनी तात्काळ दुकानात येत महागाव पोलिसांना माहिती दिली.चोरी झालेल्या प्रकाराची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला दिल्या वरून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड,विशाल गेडाम,दीपक माळी, सुनील जाधव,नेताजी निर्मळकर, विवेक पारटकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्हीही दुकानांची पाहणी केली. तर स्थानिक गुन्हे शाखा पुसद येथील पथकानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

 चोरट्यांनी हिवरा (संगम) परिसरात कहर केला. वर्षभरात डझनच्यावर घरफोडी, दुचाकी, शेती साहित्य, वाटमारी करून लुटीचे प्रकार, जनावरे चोरी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यात सर्वत्र चोरांनी उच्छाद घातला आहे. महागाव पोलिसांकडून कोणताही तपास होतांना दिसत नाही. या सतत घडणाऱ्या चोऱ्यांमुळे हिवरा परिसरतील जनता कमालीची वैतागली असल्याने पोलिसा बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.