✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.16 नोव्हेंबर) :-
वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खेमजई येथे माजी विद्यार्थ्यांची सहविचार सभा घेण्यात आली.यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या एक ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेचा विकास व्हावा या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.
संघाचे अध्यक्ष म्हणून रमेश बावणे, उपाध्यक्ष ईश्वर हजारे, कोषाध्यक्ष लंकेश भेले, सचिव मुख्याध्यापिका चेतना मून, सदस्य सर्व सन्माननीय माजी विद्यार्थी. सल्लागार सदस्य म्हणून रवींद्र चौधरी पालक प्रतिनिधी, विजय चौधरी सेवानिवृत्त कर्मचारी, ईश्वर टापरे शिक्षक प्रतिनिधी याप्रमाणे सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली.
कार्यकारीणीच्या निवडीनंतर शाळा विकासासाठी आवश्यक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि कृती आराखडा तयार करून संबंधितांना जबाबदारींचे वाटप करण्यात आले.यामध्ये वृक्षारोपण करणे, कंपाउंड करिता जाळी लावले, शाळेचा परिसर सुशोभीत करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणे, स्नेहसंमेलन घेणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सर्व स्थानिक तथा बाहेरगावी नोकरी,उद्योग,राजकारण, शेती, साहित्य तथा अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सहयोग मिळवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.यावेळी मनीषा चौधरी सरपंच ग्रामपंचायत खेमजई, रवींद्र रणदिवे अध्यक्ष शा. व्य. समिती, अर्चना लांडगे उपाध्यक्ष शा. व्य. समिती,रमेश चौधरी सदस्य ग्रा.पं. खेमजई, ,विलास चौधरी,धनपाल चौधरी,प्रमोद गायकवाड, विजय निब्रड,रवींद्र चौधरी, संजय शेरकुरे, विनायक बावणे, संतोष श्रीरामे,रोशन हजारे, प्रशांत हजारे, हनुमान धाबेकर, शाळेतील शिक्षक गणेश राऊत आणि प्रदीप ढोके इत्यादी उपस्थित होते.







