माहूर शहरासह तालुक्यात भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त तैल चित्राची मिरवणूक संपन्न

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.19 नोव्हेंबर) :- 

श्री क्षेत्र माहूर येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, आदिवासी व युवक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भगवान बिरसा मुंडा चौकात आयोजित कार्यक्रमांत हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या बलिदान व संघर्षमय आयुष्याचे स्मरण करण्यात आले तर आज दि 16 रोजी माहूर शहरातून क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोर पिसारा डोक्यावर घेऊन संगीताच्या तालावर नृत्य करणारे आदिवासी बांधव सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

राष्ट्रीय महामार्गावरील क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा चौकातून तैलचित्राची भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनी जगदंबा हायस्कूल भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसर चक्रधर नगर हुसैनि चौक राजे मधुकर देशमुख यांचा वाड्यासमोरून ब्राह्मण गल्ली महाराणा प्रताप चौक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम चौक या मिरवणूक मार्गावरून मिरवणूक काढून भगवान बिरसा मुंडा चौकात मिरवणुकीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले या मिरवणुकीत सर्व समाज बांधवांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

मिरवणुकीत भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने नगरसेवक प्रतिनिधी देविदास सीडाम शामराव कुमरे रुपेश कोवे किसन कुंमरे पवन कनाके कालिदास नैताम विकास टेकाम पंकज वाटोळकर राजू कोवे राम सोयाम कोठेकर नामदेव सोयाम सोनू तोडसाम दिलीप आडे राजू आडे सुधाकर चांदेकर शुभम वेट्टी गजानन कुरसंगे प्रकाश पेंदोर बंटी तोडसाम शुभम सीडाम यांचे सह महिला भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.