हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सव १५० वर्षपूर्ती निमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे भव्य आयोजन

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.5 नोव्हेंबर) :- 

दि. ०७/११/२०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सव ता. माहुर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक ०७/११/२०२५ रोजी हा कार्यक्रम सकाळी ठिक ९.३० वा. होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सामूहिकपणे वंदे मातरम् गीत म्हणणार आहेत आणि संस्थेत विविध देशभक्तिपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोबतच माहूर शहरातील विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. अशी माहिती दिनांक ०३/११/२०२५ रोजीच्या मा. तहसिलदार, माहूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयीन बैठकीमध्ये देण्यात आली. सदर बैठकीमध्ये समिती सदस्य व सर्व शिक्षकीय /कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे प्राचार्य माननीय श्री. फारुकी ए. वासे यांनी केले असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जोपासण्यासाठी तसेच वंदे मातरम् गीताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी विषयी जनजागृती घडविण्याचा या उपक्रमांचा उद्देश आहे. या निमित्ताने संस्थेमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचा इतिहास व महत्व यावर व्याख्यान, देशभक्तीवर नाटीकेचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच कर्मचारीवर्ग उत्साहाने

सहभाग घेणार असून परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण होईल. प्राचार्य मा. श्री. फारुकी ए. वासे यांनी सांगितले की, “वंदे मातरम् हे केवळ गीत नाही तर आपल्या स्वातंत्र्याचा आत्मा आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.” या कार्यक्रम व उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान व सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ होणार आहे.