🔸राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, बहुजन मुक्ती पार्टी सह विविध संघटना होतील सहभागी
✒️यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.13 ऑक्टोबर) :- ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास लोकशाहीचे रक्षण केल्या जाऊ शकते, ईव्हीएम मशीन द्वारे निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका होऊ शकत नाही हे सिद्ध झाले, तरीसुद्धा निवडणूक आयोग जनतेवर जबरदस्तीने evm मशीन च्या माध्यमातून निवडणुका थोपवत आहे, यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, भारतीय मताधिकार वाचला तर लोकशाही वाचेल व संविधानिक मौलिक अधिकार वाचतील.
संविधान व लोकतंत्र याची रक्षा करण्याकरिता तसेच बहुजन समाजाचे मौलिक संविधानिक अधिकारासाठी तसेच या देशातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्यायाकरिता आणि यवतमाळ नांदेड जिल्ह्यातील निम्न पैनगंगा धरण प्रकल्पात हजारो हेक्टर सुपीक जमीन बुडणार व शेतक-याचे भवितव्ये आणि जिव धोक्यात असताना ग्रामसभेला न विचारता पेसा कायद्याचा भंग करुन उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पा विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलनाचे चौथे चरण विशाल जन आक्रोश रॅली 15 ऑक्टोबर ला आझाद मैदान च्या समोर महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाजवळून निघणार आहे व ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकेल, जनतेच्या वाढत्या समस्या निर्माण झाल्या असून शिक्षण नोकरी शेती संपुष्टात आणण्याचे काम निरंतर केला जात आहे यामुळे देशातील एस.सी, एस.टी, ओ.बी.सी, व मायनॉरिटी सर्व धर्म परिवर्तित बहुजन समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहेत,.
या महा विशाल रॅली च्या माध्यमातून, ईव्हीएम मशीन चा निवडणुकी मध्ये वापर न करता निवडणूक बॅलेट पेपर वर घ्याव्या, ओबीसी ची जात निहाय जनगणना करून त्यांना जनसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे व त्याचबरोबर ओबीसी वर लादलेले क्रिमिलेयर हटवावे, बुद्धगया महाबोधी महाविहार ब्राह्मण महंताच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांना ताबा द्यावा, व व वक्फ बोर्ड संशोधन बिल तात्काळ रद्द करावे, आदिवासींवर होणारा अन्याय व त्याच्यावर तात्काळ थांबवून त्यांना जबरदस्तीने विस्थापित करणे थांबवावे, नवीन शिक्षण नीती तात्काळ रद्द करावी, RTE मध्ये सुधार करून TET परीक्षा रद्द करावी, निम्न पैनगंगा प्रकल्प तात्काळ रद्द करावा या सर्व विविध मागण्या घेऊन हा विशाल जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या महा विशाल आक्रोश रॅलीमध्ये विविध संघटनांचा मोठ्या प्रमाणात समावेश होत असून सर्व शोषित पीडित नागरिकांनी या आंदोलनाला मोठ्या उपस्थितीमध्ये साथ सहयोग देण्याचे आव्हान भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा.सुनील गवई यांनी केले आहे. हि विशाल महाआक्रोश जन रॅली 36 राज्यांमध्ये 567 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे, व या रॅलीमध्ये भारतीय बेरोजगार मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चा मोठ्या प्रमाणात सहभागी होईल असे भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत मुनेश्वर व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भुवन मुनेश्वर यांनी ही माहिती दिली.







