✒️विश्वनाथ महामुने महागाव Mahagaon विभागीय प्रतिनिधी
महागाव(दि.11 ऑक्टोबर) :-
माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर एका जातीयवादी धर्मांध व सनातनवादी माथेफिरू कडून जोडा फेक प्रकरण अतिशय निंदनीय घटना घडली. या घटनेचा निषेधार्ह महागाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 10 ऑक्टोबर रोजी निषेध नोंद करीत महामहीम राज्यपालांकडे निवेदन सादर करण्यात आले.
महागाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेने दोन सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण जी गवई साहेब यांच्यावर झालेल्या निंदनीय हल्ल्याचा यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महागाव तहसील प्रशासनाद्वारे महामहिम राज्यपाल यांना निवेदन सादर करत भावना व्यक्त करण्यात आल्या. राकेश किशोर यांनी केलेल्या जोडाफेक प्रकरणी त्यांचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा.
सदर प्रकरण अतिशय निंदनीय असून संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी. त्यांची वकिलीची सनद रद्द करावी व त्यांना अटक करून न्यायालयीन कार्यवाही व देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा अशा आशयाचे निवेदन राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 10 ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आले. देण्यात आलेल्या निवेदनावर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी कावळे, अँड. गजेंद्र देशमुख साहेब (वाकोडीकर), आरटीआय कार्यकर्ते संजय नागरगोजे, पत्रकार विश्वनाथ महामुने, प्रफुल खंदारे, श्रीराम इंगोले, राजू राठोड, दत्तराव राठोड, शंतनु पाटील आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







