चुनाळा येथे गोशाळा परिसरात वृक्षारोपण

✒️ सौ .सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.7 ऑक्टोबर) : – राजुरा येथील निर्वेद बहुउद्देशिय सामाजिक संस्था, राजुराच्या वतीने २ ऑक्टोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि विजयादशमी निमित्याने चुनाळा येथील गोशाळा परिसरात पर्यावरण बचावाचा संकल्प करीत” एक पेड मा के नाम” उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे.

त्यामुळे मानवी जीवनावर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे.वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.त्यामुळे प्रत्येकांनी वृक्षाचे जतन करणे आवश्यक आहे. यावेळी निर्वेद बहुउद्देशिया सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष सतिश सुर, राहुल गायकवाड, सुमित कल्लूरवार, जितेंद्र झाडे गोशाळेतील छत्रवास येथील मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.