माहूरच्या डी वाय एस पी पदी किरण भोंडवे रुजू 

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.7 ऑक्टोबर) :- 

माहूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर अनेक दिवसापासून रामकृष्ण मळघणे हे कारभार पाहत होते शासनाकडून नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेले किरण भोंडवे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने दि 7 रोजी त्यांनी माहूरचा पदभार स्वीकारला.

डी वाय एस पी, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून किरण भोंडवे यांनी माहूरचा पदभार स्वीकारताच माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी शरद घोडके पोउपनि पालसिंग ब्राह्मण पोउपनि संदीप अन्येबोईनवाड पोउपनी बाबू जाधव यांचे सह पोलिस कर्मचारी शहरातील मान्यवरांनी त्यांचा हृदय सत्कार केला.