🔸महसूल विभाग नवरात्र उत्सवात भाविकांच्या सेवेत मग्न असल्याचा घेतला फायदा
🔹वाळू तस्करांना सळो की पळो करून सोडणारे नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल लक्ष देतील काय
✒️ शेख रफिक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.2 ऑक्टोबर) :-
नवरात्रोत्सवात महसूल विभाग भाविकांच्या सेवेत मंग्न असल्याचा फायदा घेत पैनगंगा नदी पत्रावरील पुलाच्या दोन्ही बाजूचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने दुसऱ्यांदा आठ दिवसाची परवानगी काढून रुई येथील सर्व क्रमांक ५७ मधून भरमसाठ मुरुमाचे उत्खनन केल्याने माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावानी .राज ठाकूर यांनी जाय मोक्यावर जाऊन पाहणी करत संपूर्ण माहिती महसूल विभागाला निर्दशनास आणून दिली व सदरील ठिकाणची ईटीएस (रोव्हर ) मोजणी करून ज्यादा मुरूमाचे उत्खनन झाले असल्यास कंत्राट दाराकडून रॉयल्टी भरून घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे दि १ रोजी नायब तहसीलदार कैलास जेठे यांना देण्यात आला आहे.
धनोडा ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या अवस्थेत सुरू आहे या रस्त्यावर हजारो ब्रास मुरुमाचा वापर करण्यात आला असून त्यासाठी नाम मात्र रॉयल्टी भरण्यात आली अनेक वर्षांपासून रखडलेल्या धनोडा केरोळीच्या मध्ये पैनगंगा नदी वरील पुलाचे काम कंत्राटदारांनी पूर्ण करून दोन वर्ष झाले परंतु दोन्ही बाजूचे अर्धा अर्धा किमी रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदारांनी केले नसल्याने या पावसाळ्यातही तीन वेळा जुन्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प होऊन हजारो भाविक अडकल्याची घटना घडली घडल्याने वरिष्ठाकडून दबाव आल्याने शारदा कंट्रक्शन या कंपनीच्या कंत्राटदारांनी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता बनविण्यासाठी मुरूम उत्खनन करून वाहतुकीची परवानगी मागितली होती.
पंधरा दिवसाआधी ३०० ब्रास व दि ,२४ सप्टेंबर रोजी आठ दिवसाची परवानगी देण्यात आली होती यासाठी कंत्राटदाराने फक्त सहा हायवा वापरले जातील असे लेखी आश्वासन दिले होते परंतु एका दिवसात एका हायवाने बारा ते पंधरा चकरा मारल्या सोबत विना नंबरचे काही हायवा द्वारे दिवस रात्र मुरूमाचे उत्खनन करण्यात आले होते याची तक्रार झाल्याने संबंधित ठिकाणची एटीएस मोजणी करण्यात आली अर्जदारांनी ऐटीएस मोजणीचा अहवाल आल्यानंतरच दुसरी परवानगी देण्यात यावी असे पत्रात नमूद केलेले असतानाही कंत्राटदारास पुन्हा त्याच ठिकाणावरून मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली. यावेळी हाच किस्सा गिरवत कंत्राटदाराने रात्रंदिवस मुरूम उत्खनन सुरू ठेवल्याने पुन्हा तक्रार करण्यात आली असून मुरूम वाहतुकी दरम्यान रुई ते केरोळी फाटा या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली असल्याने संबंधित कंत्राटदाराकडून ज्यादा मुरूम उत्खननाची रॉयल्टी भरून घ्यावी तसेच रस्त्याच्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी त्यांच्याकडून रस्ता दुबार बनवून घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कंत्राटदारांचे हात वरपर्यंत पोहोचलेले असल्याने त्याच्यावर कुठलाही अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याने वाळू तस्करांना सळो की पळो करून सोडणारे नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल हे या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनकर्त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे.







