✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.2 ऑक्टोबर) :-
आज नवमी सनाचे औचित्य साधत राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे आरोग्य साक्षरता वाढविणे या हेतूने व महीला आरोग्य कौटुंबिक प्रगतीच्या दृष्टीने केंद्रीय महिला कुटुंब व बालकल्याण मंत्रालय व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने १७सप्टेबंर ते 2आक्टोबंर या काळात संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर सवना ता. महागाव येथील ग्रामीण रुग्णालयात उद्घाटन करून मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक पर भाषनात वैद्यकीय परीचारीका प्रमुख सौ. प्रियंका भोसले यांनी ऊपस्थीतांना या शिबीराचे महत्व विषद केले. महीलांचे आरोग्य म्हणजे संपूर्ण कुटुंब सशक्तीकरणा बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. सवना ग्रामस्थांच्या वतीने गोविंदराव देशमुख यांनी आजच्या ग्रामीण जनतेच्या आरोग्याची वस्तुस्थिती मांडुन आपबिती कथन केली. सध्याची बदलत चाललेली जीवनशैलीत घेण्यात येत असलेले विषयुत्क आहार धान्य, भाजीपाला,दुध किती विषयुत्क आहे, याबाबत स्वतःचा अनुभव कथन केला. सर्वांनी विषमुक्त आहार, अन्नधान्याची मागणी करण्यासाठी आग्रही आसावे, या पद्धतीचे यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय अधिकारी डॉ. नाईक होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अस्वार, डॉ. दुधे, देवसरकर,राठोड, सवना गावचे सरपंच वंसत दुर्वे, पोलिस पाटील वानखेडे, मनोज गोरे, विठ्ठल गांवडे, अतुल राठोड, आरोग्य कल्याण समिती सदस्य गोविंदराव देशमुख सवनेकर यांचे सह यावेळी अनेक गावकरी व रुग्णालयांतील सर्व कर्मचारी वृंद हिगांडे,झाडे, श्रीमती भोसले, प्रियंका(अधिपरिसेविका )सर्व ब्रदर,परीचारीका इत्यादी उपस्थित होते.
या वेळी ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची काळजी व परसबाग ईतर महत्वाचे मार्गदर्शन एका सुंदर कलाकृतीच्या माध्यमातून डेमास्टेशनच्या माध्यमातून सुरेख अशी मांडणी करून दाखविण्यात आली. या ठिकाणी मीळत आसलेल्या आरोग्य सेवा व उपचारांसाठी उपस्थितांनी आभार व्यक्त करुन समाधान मानले.







