🔹परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक धोरण अंधकारमय
🔸कर्मचाऱ्यावर उपासमारीचे पाळी विजया दशमीच्या पूर्वसंध्येला उपोषणाची सुरुवात
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.2 ऑक्टोबर) :-
तालुक्यातील हिवरा (संगम) येथील समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 1943 इंग्रज काळाच्या आधीपासून निर्मिती करण्यात आलेले मागासवर्गीय वस्तीगृह बंद ठेवण्यात आले. परिणामी मागील पाच सहा वर्षापासून या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणावर गदा आणल्या गेली. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकार नाही झाले. वस्तीगृह कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आणणाऱ्या हिवरा शिक्षण संस्था चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात न्याय मागणी साठी पीडित कर्मचाऱ्यांनी अखेर विजया दशमीच्या पूर्वसंध्येला दि.१ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून उपोषणास प्रारंभ केला.
महागाव तालुक्यांतील हिवरा शिक्षण संस्थेच्या वतीने समाज कल्याण विभागामार्फत हिवरा (संगम) येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अनुदानित वस्तीगृह चालविण्यात येत होते. परंतु संस्था चालकाने कोरोना काळानंतर कोणतीही पुर्व सुचना न देता वस्तीगृह अचानक बंद करून टाकले. या मुळे परिसरातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, ही बाब अतिशय चिंतनीय आहे. त्याकाळी 1943 च्या दरम्यान इंग्रज काळाआधी मोठ्या उद्धात धोरणाने त्या वेळेच्या धोरणकर्त्यांनी गावातून गोरगरिबांच्या मागासवर्गीयांच्या मुलांसाठी ज्वारी बाजरी जमा करून वस्तीगृहाचा वटवृक्ष वाढविण्यासाठी मोठ्या खस्ता खाव्या लागल्या.
कोरोना काळापासून या वस्तीगृहाचे अधिक्षक विशाल कदम,चौकीदार विजय कदम, मदतनीस अजय कदम, महिला स्वयंपाकी चंदाबाई नरवाडे असे चार कर्मचारी या वस्तीगृहावर कार्यरत होते त्यांच्यावर आज रोजी उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांनी संस्थाचालकांकडे वस्तीगृह सुरू करण्याची वारंवार विनंती केली. आज चालू करू, उद्या चालू करु असे म्हणत पाच सहा वर्षापासून वस्तीगृह बंद अवस्थेत आहे. ते सुरू करण्यात यावे याबाबत शासनाकडे वारंवार विनंती पाठपुरावा करून काही एक उपयोग झाला नाही. परिणामी संस्था चालकाच्या आडमुठ्या धोरणा विरोधात न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला कालपासून उपोषणाचा मार्ग अवलंबित शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालू केला. या वस्तीग्रह मध्ये शिकून मोठमोठे अधिकारी घडले आहेत.
सध्या वस्तीगृह बंद असल्याने महागाव तालुका माहूर तालुका आणि इतर परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वस्तीगृह पूर्ववत चालू करण्यासाठी पावले उचलावीत अशी ग्रामीण भागातील जनतेसह उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.







