वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा…शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.30 सप्टेंबर) :- 

       सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत द्यावी या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार वरोरा यांना देण्यात आले.

          मागील १५ दिवसापासून सततच्या पावसामूळे वरोरा तालुक्यातील संपूर्ण शेतजमिन पाण्याखाली गेली असून १०० टक्के सोयाबिन पिकाचे नुकसान झालेले आहे. तसेच कापसाच्या पिकाला सुध्दा फार मोठा फटका बसलेलाअसून संपूर्ण तालुक्याचा शेतकरी हवालदील झालेला असून कर्जबाजारी शेतकरी अजून परत कर्जात बुडालेला असतांना अजून पर्यंत मदतीची हमी कोणाकडून ना मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मदत मिळवून देण्यासाठी मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आपल्या मार्फत हि मागणी शासना पर्यंत पोहचवावी आणि मदत मिळून देण्यास मदत करावी अशी मागणी निवेदनावर तहसीलदार वरोरा यांना करण्यात आली.

        यावेळी मा. तालुका प्रमुख दत्ता बोरीकर. श्रीहरी सातपुते. पवन महाडिक. प्रवीण निलावार. शरद मंदाळे. प्रफुल पिंपळकर. पंडित आत्राम. देवा पांडे. व शेतकरी उपस्थित होते.